Ad will apear here
Next
धारणा बदलताहेत..
यंदाच्या एक, दोन नाही तर पाच प्रमुख सौंदर्य स्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी पटकावलं. फक्त गौर वर्ण म्हणजे सौंदर्य नाही; सौंदर्याची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करता येते, हे या तरुणींनी दाखवून दिलं. त्यामुळे समाजातील जुनाट धारणा आजची स्त्री बदलून टाकेल, असा विश्वास निर्माण होत आहे.....
.......
टोनी अॅन सिंहजमैका नावाच्या छोट्याशा बेटावर सध्या टोनी अॅन सिंह या नावाची चर्चा आहे. याला कारणही तसंच आहे. जमैकाच्या या मुलीने लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. तब्बल २६ वर्षांनंतर जमैकाला हा मान मिळाला. म्हणूनच जमैकन लोक टोनीचं भरभरून कौतुक करत आहेत. त्यातच टोनीच्या सिंह या आडवानामुळे भारतीयांचंही लक्ष वेधलं गेलं आहे.

 टोनीचे वडील ब्रॅड शॉ सिंह हे भारतीय-कॅरेबियन वंशाचे. त्यामुळे टोनीचं भारताशी लांबचं का होईना, नातं आहे. तिची आई आफ्रिकन कॅरेबियन वंशाची आहे. या स्पर्धेत भारताची सुमन राव तिसऱ्या स्थानी राहिली, तर फ्रान्सच्या ऑफली मेझिनोने दुसरं स्थान पटकावलं.

 सुमन रावला मिस वर्ल्ड एशिया हा किताब देण्यात आला. मिस वर्ल्डच नाही, तर या वर्षीच्या विविध सौंदर्यस्पर्धांनी वेगळा पायंडा पाडल्याचं पहायला मिळालं. यंदाच्या एक, दोन नाही तर पाच प्रमुख सौंदर्य स्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी पटकावलं.

 मिस टीन अमेरिका, मिस यूएसए, मिस अमेरिका, मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड या सौंदर्याचं मोजमाप करणाऱ्या स्पर्धांवर कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी नाव कोरलं. या महिलांनी सौंदर्यस्पर्धांवरचेच नाही तर सौंदर्य या शब्दावर मक्तेदारी गाजवणाऱ्या गौर वर्णाचं महत्त्व संपवलं. फक्त गौर वर्ण म्हणजे सौंदर्य नाही; सौंदर्याची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करता येते, हे या तरुणींनी दाखवून दिलं. आत्मविश्वामस आणि जिद्दीच्या बळावर आपण गगनभरारी घेऊ शकतो, हे या रूपगर्वितांनी सिद्ध केलं आहे. 

मिस वर्ल्ड’ स्पर्धेबद्दल बोलायचं तर टोनी अॅ्न सिंहच नाही तर द्वितीय क्रमांक पटकावणारी फ्रान्सची ऑफली मेझिनोही कृष्णवर्णीयच आहे. भारताच्या सुमन रावचा वर्णही गोरा नाही. त्यामुळे या महिलांनी खऱ्या अर्थाने वर्णभेदाच्या भिंती पाडल्या आहेत. यंदाचीमिस युनिव्हर्स ठरलेल्या झोझिबिनी तुंझीचा चेहरा खूपच बोलका आहे. टोनी अॅन सिंहच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. टोनीचा जन्म जमैकाचा; पण नऊ वर्षांची असताना ती कुटुंबीयांसह अमेरिकेत स्थायिक झाली. टोनी आपल्या पालकांसह फ्लोरिडाला राहते. २३ वर्षांच्या टोनीने फ्लोरिडा विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. वूमन्स स्टडीज अँड सायकॉलॉजी हे तिचे विषय. टोनीला संगीताचीही खूप आवड आहे. संगीतक्षेत्रात करिअर करण्याचा तिचा विचार होता; पण आता तिला डॉक्टर व्हायचं आहे. महिला आरोग्याच्या क्षेत्रात काम करायचं आहे. तिने फ्लोरिडातल्या कॅरेबियन स्टुडंट्स असोसिएशनची अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. टोनीने या विजयाचं सगळं श्रेय आईला दिलं आहे. आई आपलं सर्वस्व आहे, या जगात आईपेक्षा प्रिय दुसरं काहीही नाही, असं तिने म्हटलं आहे. आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आईने घेतलेल्या कष्टाची, केलेल्या अपार त्यागाची जाणीव तिला आहे. आईने आपल्याला वाढवताना स्वत:च्या अनेक इच्छा, आकांक्षा मारल्याचं ती नमूद करते.

टोनी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. ती स्वत:ला कोणापेक्षाही कमी समजत नाही. मिस वर्ल्ड स्पर्धेतल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमधून तिचा आत्मविश्वास दिसून आला. तुला मिस वर्ल्डचा किताब का द्यावा, असा प्रश्न टोनीला विचारण्यात आला होता. त्यावर आपण नव्या जगातल्या मुलींचं प्रतिनिधित्व करत आहोत, महिलांची ही पिढी जगात सकारात्मक बदल करण्यासाठी पुढे सरसावत आहे. या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या इतर मुलींपेक्षा मी वेगळी नाही. पण मला महिलांसाठी काही तरी करायचं आहे. मला ज्या संधींची कवाडं खुली झाली तिच कवाडं इतरांसाठीही खुली करायची आहेत आणि हेच माझं वेगळेपण आहे,’ असं उत्तर तिने दिलं. तिच्या या उत्तरावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. प्रत्येक तरुणीला माझ्यात तिचं प्रतिबिंब दिसावं आणि आपण काहीही करू शकतो, याची जाणीव तिला व्हावी, असंही टोनीने सांगितलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १२४ तरुणींमधून टोनीने हे विजेतेपद पटकावलं. त्यामुळे तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 

सुमन राव
या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावणारी भारताची सुमन राव मूळची राजस्थानची. सुमन एक वर्षांची असताना तिचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. सर्वसामान्य घरातल्या सुमनने मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. मिस इंडियाचा किताब पटकावला. पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली. सुमनने आधी दहा जणींमध्ये, मग पाच जणींमध्ये आणि शेवटी अंतिम तीनमध्ये स्थान पटकावलं. सुमनही आधुनिक भारताचं प्रतिनिधित्व करते.

 राजस्थानसारख्या पारंपरिक विचारसरणी असणाऱ्या राज्याशी संबंधित असूनही सुमनने स्वत:ला सिद्ध केलं. आपण मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होऊ शकू असं कधीच वाटलं नसल्याचं सुमन सांगते. पारंपरिक राजस्थानी  कुटुंबातल्या सुमनने कोणत्याही सबबी सांगितल्या नाहीत. तिने आपले मार्ग शोधले. मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवल्यानंतर तिने अडचणींना भीक घातली नाही. सुमन आपल्या मार्गाने चालत राहिली. तिचा स्वत:वर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच ती आज मिस वर्ल्ड एशिया हा किताब मिळवू शकली. ही उंची गाठणं आपल्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचं सुमन सांगते.

महिलांनाही त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असावं, असं नेहमीच वाटत आलं. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य ठरेल, असं वाटल्यामुळे मी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, मिस वर्ल्ड स्पर्धेचा इतिहास समजून घेतला. आजवरच्या मिस वर्ल्डबद्दल जाणून घेतलं. बरीच पुस्तकंही वाचली. त्यातून स्वत:ला घडवत गेले. महिलांचं आयुष्य चूल आणि मूल या चौकटीपुरतं मर्यादित नाही. त्यांना यापेक्षा खूप काही चांगलं करता येईल; पण यासाठी त्यांना संधी मिळण्याची गरज आहे. म्हणूनच मला महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करायचं आहे, असं सुमन राव हिने स्पष्ट केलं. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZFACH
Similar Posts
प्राणीविश्वात कृत्रिम प्रज्ञेचं निसर्गगान! वन्य प्राण्यांची शिकार, जंगलातली वृक्षतोड आणि माणूस आणि वन्य प्राण्यांमधला संघर्ष या तीन समस्या वनविभागाला नेहमी सतावत असतात. यावर उपाय योजण्यासाठी राजस्थान सरकारने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या सॅस या स्टॅटिस्टिकल अॅनॅलिसिस करणाऱ्या प्रसिद्ध कंपनीबरोबर करार करून एक प्रणाली विकसित केली आहे
फिनलंडमध्ये इतिहास; ३४ वर्षांच्या सना मरीन पंतप्रधान फिनलंडच्या पंतप्रधानपदी अवघ्या ३४ वर्षे वयाच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या सना मरीन यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्या जगातल्या सर्वांत तरुण महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांच्या आघाडीत असणाऱ्या चारही पक्षांच्या प्रमुख तरुण महिला आहेत. त्यामुळे फिनलंडची सूत्रे महिलांच्या हाती गेली आहेत
देशाला लाभणार पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सुरक्षाविषयक कॅबिनेट कमिटीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे (सीडीएस) नवे पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशाला प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात चीफ ऑफ
रॉक्सेट बँडची गायिका... रॉक्सेट या स्वीडिश बँडच्या माध्यमातून मरी फ्रेड्रिकसन यांनी तरुणाईला शुद्ध रॉक संगीताची भुरळ घातली. अलीकडेच त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language